युरिनमध्ये जळजळ, अडथळा येणे, यासाठी गोक्षुरादि गुग्गुळ द्यावे याने युरिन साफ होते व वेदना दूर होतात.
गोक्षुरादि गुग्गुळ.....
.. किडनी.हा फार महत्वाचाशरिरातील अवयव आहे.. विघातक पदार्थ, विषारी घटक काढण्याचं काम किडनी अव्याहतपणे करत असते. पण तरीही कधी तरी तिच्या वर लोड येतं. आणि मग त्रास सुरू होतो
...क्रियेटिन लेव्हल वाढते आणि बरेच वेळा रूग्णांना .. डायलिसिस वर ठेवले जाते..
... अशा वेळी. . आपल्या.. आयुर्वेदात.. फार अनमोल असे औषध आहे जे या त्रासातून मुक्त करते.
आणि किडनी मजबूत करते. ते आहे..गोक्षुरादि गुग्गुळ. गोखरू व गुग्गुळ यांच्या संयोगाने तयार केलं जातं.. आपण बघणार आहोत याचे बहुमोल फायदे...👇
..मुत्रखडा...हा क्रिस्टल स्वरूपात असतो. जेव्हा हे मोठ्या प्रमाणात वाढतात. तेव्हा असह्य वेदनां होतात. व शस्त्रक्रिया करण्याची वेळ येते. अशा वेळी. गोक्षुरादि गुग्गुळ. वरुणादि काढा एकत्र दिल्यास काही दिवसांतच मूतखडे तुटून बाहेर पडतात.
युरिनमध्ये जळजळ, अडथळा येणे, यासाठी. गोक्षुरादि गुग्गुळ द्यावे. याने युरिन साफ होते. व वेदना दूर होतात. युरिक एसिड वाढल्याने सांधेदुखी सुरू होते, एडि, गुडघे, दुखतात. हि वटि जेवणानंतर दोन घ्यावे. आराम पडतो.पुरूषांना नेहमीच.. प्रोस्टेट ग्रंथी चा त्रास होतो.सूज व वेदना होतात. अशा वेळी
...गोक्षुरादी गुग्गुळ वटि दोन वेळा जेवणानंतर घ्या. याने आराम मिळतो.
....हि वटी फक्त. मूत्रविकारा वर काम करत नाही तर, शरिरात वाढलेले कोलेस्टेरॉल कमी करते,.
फिस्टुला वर हे उत्तम कार्य करते.स्रियांना मासिक पाळीत होणारे त्रास देखील कमी होतात
......श्वेतप्रदर, आणि संसर्ग याचा त्रास झाल्यास . गोक्षुरादि गुग्गुळ वटि जेवणानंतर दोन गोळ्या द्या.
.. हळूहळू फरक पडतो. ज्यांना संतति होण्यासाठी अडचणी येतात अशावेळी,ओवुलेशन वाढण्यासाठी
व पुरुषांमधील शुक्राणू वाढण्यासाठी.. रोज.गोक्षुरादि गुग्गुळ वटि जेवणानंतर घ्या.
... फायदा होतो..
आता आपण बघू या याचे घटक...👇
शुद्ध गुग्गुळ..२८० ग्राम..गोक्षुर..११२० ग्राम.. हिरडे..१००ग्राम..बेहडा..१०० ग्राम.,
आवळा..१०० ग्राम., .. सुंठ..१०० ग्राम..,. पिंपळि..१०० ग्राम., काळे मिरे..१०० ग्राम.
नागरमोथा..१०० ग्राम..
. यातिल. महत्वाचे...गोक्षुर.. हे शरिराची सूज व वेदना कमी करते, स्त्रियांच्या. गर्भाशयावर उत्तम कार्य करते. पुरुषांचे शुक्राणू वाढवते,
.. आवळा हा.पचन चांगले करवतो भूक लागते, बद्धकोष्ठता मंदाग्नी अरुचि होत नाही
हिरडे हे जखम झाली तर सूज उतरते, पाचक आहे, पोट साफ होते,
पिंपळी हि जठरावर चांगले कार्य करते, स्राव तयार करते, व त्यामुळे पचन नीट होते.
बेहडा. हा इम्यून सिस्टीम मजबूत करतो,. सूज कमी करतो, शरिरातील संक्रमण दूर करतो.
सुंठ. हि भूक वाढवते व नवीन रक्त तयार करते, जंतूनाशक आहे, पाचक रस उत्तेजित करते
काळे मिरे.. हे जंतू नाशक आहे,. सूज उतरते, पूरक कार्य करते..
गुग्गुळ. हे अनेक रोगांवर उपयोगी आहे, हे पूरक म्हणून कार्य करते..
तेव्हा अशा प्रकारे हे मौल्यवान आयुर्वेद औषध गरजेनुसार घेतल्यास बरेच आजार बरे होतात...
...हि माहिती मी.. आयुर्वेद अभ्यासक..त्या अनुषंगाने आपणास दिलि आहे...
Post a Comment