AD

झोप शांत लागण्यासाठी उपाय

 झोप शांत लागण्यासाठी उपाय :



झोपण्यापूर्वी पाय धुवून घ्या. पायाच्या तळव्यांचा मसाज करणे चांगले असते.

झोपताना सैल आणि आरामदायक कपडे घालावेत, ज्यामुळे शरीरात हवेचा संचार होईल.


झोपण्यापूर्वी काही वेळ दीर्घ श्वसन करा. तसेच ध्यान अवश्य करा.


दक्षिणेकडे पाय करून झोपू नका. गुरू, देवता, त्यांच्या मूर्ति, चित्र, वस्तू तसेच आदराच्या स्थानाकडे पाय करू नये.


स्वयंपाक घरात झोपू नये. तसेच बेडरूममध्ये खाद्यपदार्थ ठेवू नये.


बेडरूममध्ये ताजी खेळती हवा यायला हवी याकडे लक्ष द्या.


कधीही अंधाऱ्या, दमट आणि ओलसर खोलीत झोपू नये.


झोपताना डोकं थोडं उंच ठेवा. त्याकरिता पातळ उशीचा वापर करा.


उन्हाळ्यात छतावर किंवा मोकळ्या आकाशाखाली झोपू शकता. मात्र थंडी किंवा पावसाळ्यात नको.


थेट सूर्यप्रकाशात झोपणे योग्य नाही. मात्र वातावरण चांगले असल्यास टिपूर चांदण्याखाली तुम्ही झोपू शकता.


दुपारी का झोपू नये | दिवसा झोपणे योग्य आहे का? 


आयुर्वेदानुसार दिवसा झोपल्याने शरीरातील कफ वाढतो. रक्ताभिसरणात अडथळे येतात. त्यामुळे डोकं जड वाटतं, श्वास घ्यायला त्रास होतो. आळस, सर्दी-खोकला, डोकेदुखी, अपचन, खाज, फोडं, घश्याचा त्रास, रक्ताची कमतरता इत्यादी आजार संभवतात. या सर्व कारणांमुळे दुपारी झोपू नये. तरीही काही व्यक्तींना दुपारी झोपण्याची गरज असते. त्यांच्या बद्दल जाणून घेऊया.


दुपारी फक्त ह्यांनीच झोपावे :


दुपारी जेवण झाल्यावर लगेच झोपू नये. मात्र न झोपता केवळ पडून रहावे असे जरूर वाटते. जड जेवणानंतर थोडा वेळ विश्रांती घेणे आरोग्यासाठी चांगले असते. मात्र बसून थोडी डुलकी घेणे (५-१०मिनिटे) जास्त योग्य असते. दुपारच्या जेवणानंतर असे केल्याने वात, कफात संतुलन साधले जाते.

लहान मूल व वृद्ध व्यक्ती.


रात्र पाळी करून येणारी व्यक्ती.

जे अति शारीरिक वा मानसिक काम करतात असे लोक.


ज्यांना वेदना, मार, आघात, क्षय आदी व्याधी आहेत असे लोक.


ज्यांना अतिशय तहान लागते, तसेच डायरिया, पोटदुखी, श्वासाचे विकार, उचक्या, किंवा मासिक पाळीत खूप वेदना होतात.


ज्यांना क्रोध, भय, उदासीनता घेरून असते.

मोठ्या प्रवासानंतर, खूप जड वजन उचलल्यानंतर, अति संभोगानंतर, जास्त मद्यपान केल्यानंतर, खूप वेळ गायन किंवा अभ्यास केल्यानंतर.


पंचकर्म चिकित्सेनंतर.

उच्चतम तापमान असते अश्या दाहक उन्हाळ्यात दिवसा थोडी झोप घेणे योग्य असते.


दुपारी कोणी झोपू नये?


कफकारक प्रकृतीच्या व्यक्ती.

शरीरात कफाचे संतुलन बिघडले असल्यास.

अतिशय स्थूल व्यक्तींनी.


जर शरीरात विषाक्त तत्व वाढलेले असल्यास दुपारी झोपू नये.


निद्रानाश उपाय | गाढ निद्रेसाठी अजून काही उपाय :


पूर्णपणे आच्छादलेली सुंदर शय्या.

खोलीत मंद सुगंधाचा दरवळ आणि मधुर संगीत.


स्वच्छ, शांत, मोकळी आणि आरामदायी खोली.


योग्य वेळेत झोपण्याची आणि जागे होण्याची सवय.


तेलाने अभ्यंग मालिश करून स्वतःला शिथिल करा.


वरील काही निद्रानाशासाठी उपाय आहेत. आयुर्वेदिक वैद्याच्या सल्ल्यानुसार, व्यक्तीगत पातळीवर चांगली झोप येण्यासाठी नैसर्गिक (हर्बल) उपाययोजना केली जाऊ शकते


No comments

Powered by Blogger.